नवी सांगवी,दि. ५:- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील साई चौक भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

भाजी मंडईचे अध्यक्ष संजय मराठे यांनी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ते म्हणाले कि, “दोन वर्षापूर्वी १ जानेवारी रोजी भाऊंनी भाजी विक्रेते रस्त्यावर थांबल्यानंतर होणारी अतिक्रमणाची कारवाई, भाजी विक्रेत्यांना जागेचा अभाव अशा अनेक समस्या जाणून घेऊन साई चौक येथे भाजी विक्रेतांना जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज साई चौक भाजी मंडई येथे तब्बल १२६ भाजी विक्रेते भाजी विकून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरीत आहेत. भाऊंनी केलेले हे उपकार भाजी विक्रेते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.”

त्यावेळी भाजी मंडईचे अध्यक्ष संजय मराठे, उपाध्यक्ष अनिल कांबळे, कुणाल धिवार, रमेश डफळ, बबन डफळ, गणेश मते, नवीद खान, अंकुश आपेट, बळीराम भोंगे, बळी बिरादार, निलेश बडगुजर, नितीन दोधाड, नरसिंग यादव, सुनील सावंत, अण्णा नायडू, गणेश पैठणे, रामजी आगलावे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!