पुणे दि.२२( punetoday9news):- पुणे विभागातील ४१ हजार ५४१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७० हजार ७०१ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण २७ हजार १३० आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण २ हजार ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८२४ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ५८.७६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील ५८ हजार २७ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ३६ हजार २७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २० हजार ५४५ आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १४ हजार ७४८, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ८१३ व पुणे कॅन्टोंन्मेंट २५७, खडकी विभागातील ४६, ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ५८१, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील १०० रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण १ हजार ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार ६१, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २३६ व पुणे कॅन्टोंन्मेंट २९, खडकी विभागातील २७, ग्रामीण क्षेत्रातील ६८, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ५९३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ६२.०९ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.५१ टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ४ हजार ७१२ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४ हजार १४, सातारा जिल्ह्यात ७६, सोलापूर जिल्ह्यात ३००, सांगली जिल्ह्यात ४० तर कोल्हापूर जिल्ह्यात २८२ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
Comments are closed