पिंपरी, दि. ७. रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व्यायामशाळा आनंदनगर येथील योजक स्टडी सेंटर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिम्मित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
चिंचवड स्टेशन आनंदनगर येथील झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस घेण्याचे कार्य योजक स्टडी सेंटर यांच्या माध्यमातून केले जाते. या सेंटर मध्ये पहिली ते चौथी ३० विद्यार्थी , पाचवी ते सातवी ५४ विद्यार्थी व आठवी ते दहावी ३५ विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज होती याकरिता रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने २८ डझन वह्या, रजिस्टर व १०० पेनाचे २ बॉक्स देण्यात आले..
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर व योजक स्टडी सेंटरच्या प्रमुख चैताली बोरोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व या दोन्ही प्रमुख मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सावित्रीमाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या राज्य समन्व्यक श्वेता ओव्हाळ मॅडम यांनी असे मत व्यक्त केले कि इतिहासात महिलांना शिक्षणासाठी बंदी होते,महिलांनी शिक्षण घेऊ नये असा विचार त्याकाळी रूढ होता आणि त्या विरोधात सावित्रीमाईंना लढावे लागले होते आणि आजही मुलींनी शिकू नये हि मानसिकता काही प्रमाणात आहेत ती संपवण्याकरीता सावित्रीमाईंचा आदर्श घेऊन रयत विद्यार्थी विचार मंच व योजक स्टडी सेंटर कार्यरत आहे.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ,सहसचिव भाग्यश्री आखाडे,पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष मयूर जगताप,समाधान गायकवाड,अभिषेक चक्रनारायण,अजय चक्रनारायण तसेच योजक स्टडी सेंटरच्या प्रमुख चैताली बोरोले,ममता भावसार,सना पटेल,अनिता पाखरे उपस्थित होते.
Comments are closed