पुणे,दि. ७:- पालघरच्या तन्वी पोस्तुरे हिने ५३ किलो गटात सुवर्णपदक जिंकून महिलांच्या तायक्वांदो स्पर्धेत चमकदार यश मिळविले. अन्य गटात रागिणी जयस्वार (४९ किलो) व आकांक्षा बोरकर (५७ किलो) यांना सुवर्णपदक मिळाले.
शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत पोस्तुरे हिने ५३ किलो गटाच्या अंतिम फेरीत पुण्याच्या श्रुती शेटे हिच्यावर मात केली. या गटात श्रुती शिर्के (मुंबई( व विद्या नागपूरे (नागपूर) यांना ब्रॉंझपदक मिळाले. ४९ किलो गटाच्या अंतिम फेरीत रागिनी हिने पालघर संघाची खेळाडू माही निपाणकर हिचा पराभव केला. भक्ती चव्हाण सातारा व अपूर्वा देसाई रायगड यांना ब्रॉंझपदक मिळाले.
महिलांच्याच ५७ किलो गटात पुण्याची आकांक्षा बोरकर हिने सोनेरी कामगिरी करताना रायगडच्या जयश्री गोसावी हिचा पराभव केला. धृती हाते (मुंबई) व सपना मोरे (सातारा) यांनी ब्रॉंझपदक जिंकले.
Comments are closed