सांगवी,दि.१३:- नवी सांगवी प्राथमिक शाळा,नवी सांगवी पुणे या प्रशाले मध्ये सावित्रीबाई फुले जयंती व दत्तक पालक योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड,पंकज सोलंकी,तारासिंग चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कोळे होत्या नवी प्राथमिक शाळा,नवी सांगवी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रशालयातील या कार्यक्रमा मधे दत्तक पालक योजने अंतर्गत 32 गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या फी रूपी निधीचे वाटप करण्यात आले.या मध्ये संजय मराठे,ज्योती संतोष हिरेमठ,सयाजी संदीप चौगुले,सुनिता माळवदे,राणी टोपले,दीपिका कुलथे,गौरी नरळे,अनुश्री नाझरकर,किरण होनखांबे इत्यादी दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी अर्था मदत केली.त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थी प्रामुख्याने आनुजा पंडित,अथर्व अवघडे,सार्थक अंधारे,विवेक पंडित,विभावरी ढोबळे,प्रथमेश बावधने,धनश्री खंडागळे,वैष्णवी वाचाळ यांनी आपले साठवलेले खाऊचे पैसे जमा करून आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे प्रशालेतील मुख्याध्यापिका माधुरी कोळी,मंजिरी चांदेकर,संगीता सोनवणे,माधवी गुरव,सुनील दरेकर,उषा पोळ,राजश्री पतंगे,संगीता फराटे या कर्तव्यदक्ष शिक्षकांनी ही देणगी या कार्यक्रमासाठी दिली शिक्षक व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यामध्ये काही दानशूर नागरिकांनी,शाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षक,पालक व विद्यार्थी यांनी सरळ हाताने गरजू विद्यार्थ्यांना मदत केली त्यानंतर चिंचवड विधानसभेचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील दरेकर यांनी केले तर संगीता सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments are closed