नवी सांगवी ,दि.१३ :-  सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण मापारी, उपमुख्याध्यापिका संजना आवारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मनीषा वळसे याप्रसंगी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. गेली दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा, यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षीचा पहिलाच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली.
प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर सुंदर असे कलाविष्कार नृत्य सादर केले. आय लव्ह माय इंडिया, पशु पक्षांचे गाणे, देशभक्ती गीतावर फिर भी दिलं है हिंदुस्थानी, बळीराजावर आधारित शेतकरी गाण्यावर नृत्य, लावण्या, लेझीम थीम, वो कृष्णा है अशा एका हुन एक सरस बहारदार गाण्यांवर नृत्यांचा आविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितांनी उभे राहून नृत्य सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.


कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षिका माधुरी शेलार, अर्चना धुमाळ, रेखा गायकवाड, सारिका शिंदे, शीतल चव्हाण, अलका जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेमाणे, शरद शेळके यांनी केले. तर मनीषा वळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील कर्मचारी, मावशी आदी शिक्षक शिक्षकेतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!