पिंपरी (punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील जुनी सांगवी परिसरात रात्री दोन च्या सुमारास तब्बल २३ वाहनांच्या काचा कोयता व लोखंडी राॅड ने फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने सीसीटीवी फुटेजच्या आधारे तीन आरोपींना अटक केली असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.    
        सांगवी परिसरातील ही तिसरी घटना असून लाॅकडाऊन मध्ये मद्यविक्री बंद असतानाही या आरोपींना मद्य मिळाले कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मद्य प्राशन करून या आरोपींनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. तिन आरोपी पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले .
     ही तोडफोड जुनी सांगवी परिसरातील मुळा नगर, पवना नगर, प्रियदर्शनी नगर परिसरात घडली असून जवळपास तेवीस वेगवेगळ्या खाजगी वाहनांवर कोयता व लोखंडी राॅडने वार करत काचा फोडून वाहनांचे मोठे नुकसान केले आहे.
  एक ॲम्ब्युलन्स व स्कुल बसचा ही या तोडफोड केलेल्या वाहनात समावेश आहे. अगोदरच काम बंद त्यात  झालेल्या तोडफोडीबद्दल मालकाने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.
 आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक कोयता व राॅड जप्त करण्यात आला आहे. यातील एक संशयित आरोपी संगम नगर, एक पवना नगर व एक संशयित आरोपी खडकी येथील असून खडकी येथील आरोपी सराईत गुन्हेगार असून याआधी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
 या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!