तेरखेडा,दि.१७ :- विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांनी शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून उत्तम प्रकारे काम करावे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे मत सरपंच दिलीप घोलप यांनी व्यक्त केले.
बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने व कै. गोवर्धन भानुदास भोसले यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकाचा सन्मान बसवेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी सरपंच दिलीप घोलप, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाबुराव घुले, शिवाजी घोलप, बालाजी घुले, सटवाईवाडीचे सरपंच बापूराव खोत, किसन खोत, प्रवीण घुले, चंद्रकांत भोसले आदी उपस्थित होते.
संस्थेचे कार्य व वडिलांच्या आठवणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बलभीम भोसले यांनी सांगीतल्या. यावेळी भागवत भापकर, परशुराम घुले, श्रीराम घुले, प्रवीण घोलप, सुरेश गोळे, जनार्दन लुगडे, सत्तार पठाण, शोभा बगाडे, इंदू कात्रे, धर्मा सरवदे, शिवहार कुंभार, समाधान सावंत, संजीवनी थोरबोले यांचा स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले
Comments are closed