पुणे, दि. १८:- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार पुणे येथे २० व २१ जानेवारी आणि २३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असलेले अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ, महापुरुषांचे चरित्र्य व लेखनसाहित्य, शासनाची अधिकृत इतर प्रकाशने १० टक्के सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी केले आहे.
Comments are closed