“कोरोनानंतरच्या काळात अनेक नवे प्रश्न समाजातील सर्वच घटकांमध्ये निर्माण झाले आहेत.
कोरोनाने माणसाचे जगणेच भयग्रस्त झाले आहे.मांणसा माणसामधील नाते संबंधांना तडे गेले. याचा परिणाम एकूणच मानवी जीवनावर झालेला दिसतो आहे.हे लक्षात घेऊन कवींनी हे सर्व प्रश्न आपल्या लेखनाद्वारे हाताळावेत, कारण ‘ ‘कविता ‘ हीच खऱ्या अर्थाने जगणं सुंदर करणारी जीवनदायिनी आहे” असे मत नामांकित कवी प्रा महादेव रोकडे यांनी गझलकाव्य संध्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केले.
दि. २२ जानेवारी २०२३ रोजी लुंबिनी बुद्ध विहार, औंध कॅम्प, नवी सांगवी येथे प्रज्ञा शिल करुणा सामाजिक संस्था सलग्न लुंबिनी बुद्ध विहार, औंध कॅम्प व काव्यानंत साहित्य मंच पुणे यांचे संयुक्त विद्यमाने गझल काव्य संध्या कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनास प्रा. डॉ. महादेव रोकड़े (मराठी विभाग प्रमुख, टी. जे. कॉलेज)हे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. संदीप सांगळे (सदस्य- मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), प्रा. प्रदीप कदम (शिवव्याख्याते, प्राचार्य कान्क्वेस्ट महाविद्यालय, चिखली), सुनील तांबे (पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस स्टेशन),मा.डॉ
सुनंदा काटे (फर्ग्युसन कॉलेज) हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. डॉ. महादेव रोकड़े यानी भूषविले. या कवी संमेलनात बीड, सोलापुर, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, मावळ इत्यादी जिल्ह्यातील ५० ते ६० कवींनी आपला सहभाग नोंदविला. या प्रसंगी महापुरुष तसेच सामाजिक, वैचारिक, प्रेम कविता तसेच हास्य कविता सादर करून कवीनी सर्वांची मने जिंकली. अंबरीश हरगंगे या कवीने
‘चूका करतो, चूकातुन शिकतो, माणूस तसा हुशार आहे,
चूकातुन शिकण्याचे त्याचे शहाणपण नशीब अजून टिकून आहे
अहिंसा, करुणा, मुदिता मैत्री तत्वरुपाने जिवंत आहे
कारण तुझ्या आत
माझ्या आत
बुद्ध अजुन जिवंत आहे ‘
या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. दिगंबर पाटिल यांनी सावित्रीमाई ची महती सांगत स्त्री जातीचा महिमा सांगितला. अशोक शिंदे यांची ‘रंग कवितेचा’, ललिता गाढवे – तोबा तोबा (गझल), रूपचंद शिदोरे- राजमाता जिजाऊ, दिपाली खामकर – पुरुष देवाघरी जाताना, देवेन्द्र गावंडे- रमाई, वैभव शिंदे- प्रेम गोविंद पाठक – बाबासाहेब, तानाजी शिंदे – क्रांति, जयद्रथ आखाड़े – एका साडीची गोष्ट, वैभव धर्माधिकारी- आयुष्य, आप्पा वाघमारे – मी काय बायकोला भीत नाही राव, जगदीप वनशिव- एकांत, जनाबापू पुणेकर – करितो वंदन भीमाला आधी, सागर वाघमारे – तू भेटला मित्रा एका पुरस्करासारखा, इत्यादि कवीनी विविध विषयांवर कविता सादर करत उपस्थित साहित्यिकांची मने जिंकली.
उपस्थित सर्व सहभागी कवींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फुलझाड, आणि बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रा.डॉ. संदीप सांगळे यांची नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ, सदस्यपदी प्रचंड मताधिक्याने निवड झाली. सर्व प्रमुख पाहुणे, आयोजक आणि समस्त उपस्थित साहित्यिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे मा. डॉ. संदीप सांगळे मा. प्रा. डॉ. प्रदीप कदम, मा. सुनील तांबे, मा. प्रा. सुनंदा काटे यांनी सर्व कवींचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने जगणं सुंदर करणारी कविता लिहीत रहा ,तसेच अशी सर्वसमावेशक कवी संमेलने वारंवार आयोजित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत त्या दृष्टीने काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रानकवी जगदीप वनशिव ,आप्पा वाघमारे, सागर पाटील यानी केले. प्रस्ताविक मा.मोहन कांबळे (अध्यक्ष लुंबिनी बुद्ध विहार, औंध कॅम्प) यांनी केले आभार प्रदर्शन राधिका घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन राधिका घोडके आणि काव्यानंत समुहाच्या संचालिका देवयानी गवळी यांनी केले होते. गझल काव्य संध्या कवी संमेलन यशस्वी करण्याकरीता लुंबिनी बुद्ध विहार, औंध कॅम्प, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!