देहू,दि.२४:- लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहू तसेच की विस्टा ग्रुप व अनुबंध फाउंडेशन अहमदाबाद यांच्या वतीने “सीनिअर सिटिझन जीवनसाथी परिचय संमेलन” रविवार दि.(२२) स. ९ ते ५ रोजी पुणे गेट हॉटेल निगडी येथे यआयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी २०० पेक्षा जास्त इच्छुकांनी सहभाग घेतला. पन्नास पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि जोडीदार गमावलेल्या किंवा एकाकी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना जोडीदार मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली यासह देशातील विविध राज्यातील इच्छुक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नटुभाई पटेल, पुरुषोत्तम पाटील होते.
प्रमूख पाहूणे लायन नीरा आनंद , लायन राजकुमार आनंद एस.डी. मोटे, वसंत पाटील उपस्थित होते.
लायन्स क्लब श्री क्षेत्र देहू चे अध्यक्ष किरणभाई पटेल यांनी या कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन केले होते. तसेच लायन्स क्लब देहूचे उपाध्यक्ष संदीप परंडवाल, प्रकाश कांबळे, सचिव गणेश शेवकर, महेंद्र सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed