सांगवी,दि.२४ :-  कलाश्री संगीत मंडळातर्फे, २७ जानेवारी (शुक्रवार) पासून, तीन दिवसांच्या कलाश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी सांगवी येथील निळू फुले सभागृहात सायं. ५ वा. या महोत्सवाला सुरुवात होईल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश सुर्वे (निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा माई मनोहर ढोरे (महापौर, पिं.चिं. म.न.पा.) व स्वागताध्यक्षा आरती राव उपस्थित राहणार आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाचा २५ वा कलाश्री पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. रामराव नायक (गोवा) यांना प्रदान करण्यात येईल. तसेच स्व. शकुंतला नारायण ढोरे स्मरणार्थ प्रसिद्ध युवा तबला वादक पाडुरंग पवार यांना ‘कलाश्री युवा पुरस्कार” देण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी ( दि.२७ जाने ) शाश्वती चव्हाण व पं.आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन, तसेच सुप्रसिद्ध तबला वादक पं .यशवंत वैष्णव यांचे तबला वादन होईल. २८जानेवारी ला दुसऱ्या दिवशी पं. श्रीनिवास जोशी व पं.रोणू मुजुमदार यांचे बासरी वादन व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांचे गायन होईल. २९ जानेवारी रोजी पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन होईल व कार्यक्रमाची सांगता प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतार वादनाने होईल.
कार्यक्रमाचे निवेदन नामदेव तळपे व आकाश थिटे करतील.
तसेच गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या शतकोत्तर सुवर्ण १५० व्या जयंती निमित्त मानवंदना देण्यासाठी सांगवी येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिंडीसोहळा २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. सुरू होईल.
संपूर्ण कार्यक्रमाची माहिती कलाश्री मंडळाचे ट्रस्टी सच्चिदानंद कुलकर्णी ,समीर महाजन व प्रणाली विचारे यांनी दिली.
सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!