राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीर येथे दाखल झाली असून यात्रे दरम्यान बॉम्बस्फोट घडल्याने त्यांच्या सुरक्षेबाबतीत सतर्कता बाळगण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये असताना, सुरक्षा व्यवस्था मजबूत असून देखील बॉम्बस्फोट होणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. दहशतवादविरोधी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे गांधी कुटुंबीय हे कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर वर राहिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दहशतवादाच्या भ्याड हल्ल्यात बळी पडले आहे. सद्यस्थितीत राहुल गांधी यांची विशेष सुरक्षा व्यवस्था शिथिल केली आहे त्यामुळे त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारत जोडो यात्रेस जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापार्श्वभूमीवर नरवाल इथे झालेल्या हल्ल्यामुळे मूलतत्त्ववादी घटक भारत जोडो यात्रेला लक्ष्य करतील अशी शंका काँग्रेस कार्यकर्त्यांना वर्तवली जात आहे.
त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुरक्षेबाबतीत सतर्क राहण्याबाबत मागणी केली आहे.
Comments are closed