हडपसर, दि.२६ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “विशेष श्रमसंस्कार शिबीर” दि. १९ ते २५ दरम्यान कोडीत खुर्द या गावात आयोजित केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड.संदीप कदम, मानद सचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, एल एम पवार, उपसचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, ए एम जाधव,सह उपसचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि प्रसाद खैरे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ कोडीत खुर्द तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांनी स्वच्छता, वृक्ष लागवड,ग्राम सर्वेक्षण, तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत संवाद आणि पथनाट्यद्वारे जनजागृती या सारख्या समाजोपयोगी प्रबोधनात्मत कार्यक्रम राबविण्यात आले.
सदर शिबिरामध्ये विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली यामध्ये प्राचार्य अरुणा गुळुंजकर यांनी व्यक्तिमत्व विकास आणि वेळेचे व्यवस्थापन, शशिकांत राऊत यांनी थोर महात्मे होऊन गेले, प्रा. एम.बी जोगरांना यांनी ताण-तणाव्यवस्थापन, ऍड. संदेश जायभाय यांनी स्त्री सबलीकरण,डॉ.संदीप महामुनी यांनी मानसिक आरोग्य विषयांवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कस्तुरी खैरे उपसरपंच कोडीत खुर्द यांनी भूषवले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी सात दिवसात केलेल्या कामाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि सामाजिक जाणिवेतून आजच्या युवकांनी वाटचाल केली पाहिजे आणि शेवटी प्राचार्यांनी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण जाधव, प्रा. सनोबर काझी, प्रा. सीमा वावरे, प्रा.संतोष सुतार, वैशाली भैरट, नितीन तारू व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
Comments are closed