पुणे, दि. २६:-  विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम मेहता उपस्थित होत्या.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने उपयुक्त आहे. यामध्ये दररोज १०० किलो कचरा जिरवला जाणार आहे. आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपहारगृहातील ओला कचरा या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जाणार असून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरितीने होणार आहे.

ते पुढे म्हणाले, विभागीय आयुक्त कार्यालय, कष्टकरी पंचायत व वायू कंपनीच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून असे प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद आदी ठिकाणी कार्यान्वित करावेत. तसेच पुणे विभागातील अन्य सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कायालयातही प्रकल्प सुरु करावा, असे सांगून प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, अशा सूचनाही राव यांनी दिल्या.

यावेळी आयुक्त राव यांनी प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!