पिंपरी,दि.२७ :- “लहरायेगा तिरंगा” या गीताद्वारे बालकामगार, शाळाबाह्य मुलांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला हे गाणं रेडबड म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.
या सामजिक विषयावर आधारित असलेल्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल देखील होत आहे.
“लेहरायगा तिरंगा” या गीताच्या माध्यमातून शाळाबाह्य मुले, बालकामगार यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी काम करणारे बालमजूर व शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात आण्यात येते. व त्या मुलांची भारत देशाप्रती असलेली देशभक्ती हे देखील या गीताच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. बालमजूर कायदा व शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य उद्दिष्टाने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गीताचे टिझर व पोस्टरचे अनावरण नुकतेच भारताचे पहिले पॅरालिंपिंग सुवर्णपदक विजेते, भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे व सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले. या गाण्याचे लेखन व दिग्दर्शन सीए अरविंद भोसले यांनी केले आहे, इंडियन आयडॉल फेम आशिष कुलकर्णी यांनी हे गाणं गायले आहे, संगीत झील स्टुडिओचे संचालक श्रेयस देशपांडे यांनी दिले आहे. तर याचे संपादन एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. निर्माते सीए मनोज गायकवाड हे आहेत.
या गाण्यात पिंपरीतील नेहरूनगर विठ्ठल नगर पुनर्वसन झोपडपट्टीतील मुलांनी प्रथमच कॅमेरे समोर अभिनय केला आहे. आशिष नाटेकर या बाल कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. सह बालकलाकार म्हणून गौरव कदम, ओवी दैठे, कुणाल गायकवाड, वेदांत डोंगरे, कुमार अवचर, संतोष सगुंडे, कार्तिक जेगरी, अविनाश नाणेकर यांनी केले तर अभिनेता रोहित पवार व किरण कांबळे, शिवा हरळ यांनी मोठ्या कलाकाराची महत्वाची भूमिका बजावली आहे.
या गाण्याचे दिग्दर्शक व लेखक सीए अरविंद भोसले म्हणाले, आम्ही नेहमीच सामजिक विषयांवर आधारित असलेल्या लघुपटाद्वारे सामजिक प्रबोधन करण्याचे काम करीत असतो. यापूर्वी एकूण ५ लघुपट बनविले आहेत. या लघुपटा पैकी “भावना” व “निशान” लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. लेहरायगा तिरंगा गीताच्या माध्यमातून देखील बालमजूर व शाळाबाह्य मुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम आम्ही केलेले आहे.
Comments are closed