सांगवी,दि.२८:-  वसंत पंचमी निमित्त ज्ञानदेवी असलेल्या माता सरस्वतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.या दिवशी माता सरस्वतीचे मूर्तीपूजन केले जाते.पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील बंगाली समाजाच्या नागरिकांकडून नवी सांगवी येथील मल्हार गार्डन येथे सालाबाद प्रमाणे सरस्वती मातेचे पूजा व होम हवन विधिवत पद्धतीने करण्यात आले.

या दिवशी सर्व बंगाली समाज एकत्र येऊन मुलांचे बौद्धिक ज्ञान वाढावे व शिक्षणात प्रगती व्हावी या साठी सरस्वती मातेचे पूजन करतात.हा दिवस संगीत,कला इत्यादींचे ज्ञान मिळवण्यासही शुभ मानला जातो.या दिवशी सरस्वतीची पूजा केल्यास देवी प्रसन्न होते आणि भक्तांना ज्ञान,संगीत,कला इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत होण्यास आशीर्वाद देतात.

या कार्यक्रमासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले.पूजनानंतर संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले माता सरस्वती ज्ञान,कला आणि संगीताची देवी आहे.सरस्वती मातेचे पूजन करताना मला खूप आनंद झाला आहे.या सरस्वती देवीचे स्मरण प्रत्येकाने केले पाहिजे.

या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे,सरचिटणीस भा.ज.पा.यु.मो पिंपरी चिंचवड जवाहर ढोरे,सोमनाथ माल,बेचू माल,मिथून दास,पलाश माल,सुबीर पत्रा,विश्वजित माझि,पिंटू पात्रा,विभूती बेरा,हेमंत माझि,तुला दास,आनंद माल,रणजित मंडोल,मिठू माल,श्राबोंती माल,झुमा माल,स्वरा दास,शिप्रा पत्रा,दुर्गा पत्रा,तुता पत्रा,शिप्रा दास, झुंपा आश,पंपा बेरा,ममता मंडोल,पुजा माल आधी मान्यवर व बंगाली समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!