पुणे ( punetoday9news) :- पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यात दि.२३ गुरूवारी रात्री १२ वाजता १० दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळे उद्यापासून राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि सर्व व्यवहार सुरू होणार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
मात्र लॉकडाऊन संपत असला तरी गर्दी नियंत्रणासाठी विशेषतः शनिवार-रविवारबाबत प्रतिबंध लावण्याचा विचार प्रशासनाचा आहे. मात्र याबाबत दिवसात लॉकडाऊनबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे, असं विभागीय आयुक्तालयाचे विशेष कार्यअधिकारी सौरभ राव यांनी सांगितले तर शनिवार, रविवार बाजारपेठ चालू ठेवणे अथवा बंद ठेवणे याबाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून प्रतिबंध कसे राहतील यावर निर्णय घेेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
तर व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन आज संपत असल्याने पुणे प्रशासनातील जिल्हा परिषद सीईओ सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, आयुक्त पुणे महानगर पालिका विक्रमकुमार यांनी गुगल मीटद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य सरकारचे निर्देश ३१ जुलैपर्यंत कायम आहेत. त्या निर्देशांनुसार उद्यापासून परिस्थिती कायम राहील. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी असलेले P१ P२ चे नियम दुकानांना लागू राहतील, कोणताही वेगळा आदेश काढला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुर्वीच्या नियमानुसार उद्यापासून हे सुरू राहणार.
अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
खाद्यपदार्थ घरपोच सेवा
● सायकलिंग, धावणे, चालणे, अन्य व्यायाम नियमाानुसार.
● वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण
सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती असावी
●केश कर्तनालय नियम पाळून मुभा
●टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्यक प्रवासासाठी परवानगी
●वाइन शॉपसह सर्व प्रकारची दुकाने पी १- पी २ या पद्धतीने सुरु राहणार
Comments are closed