लहान मुलांच्या जीवाशी खेळ.
अन्न पुरवठा विभाग प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी.
रहाटणी, दि.३०:- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथील रस मिठास स्वीटमार्ट मधून खरेदी केलेल्या मिठाईत चक्क अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रहाटणी येथील नागरिक विजय टेपुगडे यांनी आपल्या मुलांसाठी नेहमीप्रमाणेच दूकानातून मिठाई घेतली( दि.२९/१) मात्र यावेळेस मुलांना खायला देण्यापुर्वी सहज म्हणून मिठाई चेक करत वरील कागदी वेष्टन काढले असता त्यात चक्क अळ्या ( कीडे) असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दुकानदाराकडे चौकशी केली असता ते तयार प्राॅडक्ट बाहेरून येत असल्याचे कारण देत यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्न प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक अन्न पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांकडून त्या पदार्थाची एक्स्पायरी तारीख लिहीणे बंधनकारक आहे तसेच त्या अगोदर जरी पदार्थ खराब झाला आहे असे वाटल्यास त्याची विक्री करू नये असे असतानाही बिनधास्तपणे अळ्या तयार झालेली मिठाई विकण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे तुम्हीही आपल्या मुलांना मिठाई खायला देत असाल तर किमान एकदा खोलून स्वतः पहाच. अन्यथा मोठा अनर्थ होवू शकतो.
हाॅटेलचालकाकडून जबाबदारी टाळण्यासाठी दाखवण्यात आलेले मुख्य विक्रेत्याचे बिल.
ग्राहकाने मिठाई खरेदी केल्यानंतर ऑनलाईन जमा भरलेले बिल.
Comments are closed