सांगवी,दि. ३१ :- आपल्या शाळेच्या समोरून जात असताना अलगद शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि वाटते की आपले दहावीच्या वर्गातील ते दिवस पुन्हा येतील का ? ते दहावीच्या वर्गातील मित्र मैत्रिणी व जुने आवडते शिक्षक पुन्हा दिसतील का ? या असंख्य प्रश्नांना एकत्रित करून 1994 – 95 च्या बॅच मधील मुला-मुलींनी पुन्हा 28 वर्षानंतर एकत्र येण्याची चर्चा व्हाट्सअप ग्रुप वर करून माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला.
शाळेतील व्यवस्थापकांकडून शाळेत कार्यक्रम घेण्याची परवानगी, शाळेत येणाऱ्या शिक्षकांना निमंत्रण पत्रिका देणे, शाळेत स्वागत उत्सवासाठी नाम फलक बनवणे, कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे, असे सर्व नियोजन करत शाळेत २८ वर्षा नंतर माजी विद्यार्थी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेला अत्याधुनिक संगणक देण्याचेही नियोजन करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी पांढरा शर्ट, खाकी पॅंट व विद्यार्थिनी राणी कलरच्या गणवेशात शाळेत आले. प्रार्थना झाली, विद्यार्थी विभागून दिलेल्या वर्गांमध्ये बसले व 1994-95 साली असणारे माजी शिक्षकांनीच वर्ग घेतला. जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील माजी शिक्षक विद्यार्थी व स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्नेहमेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदा शिंगाडे यांनी केले. तर प्राध्यापक डॉ. आरती भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय मराठे, तानाजी जवळकर, रवींद्र कवीटकर, गणेश नवगिरे, गिरीश शेट्टी, सचिन घाटगे, योगेश बालवडकर, मधुमती देशपांडे, प्रमिला काटकर, योजना शिंदे, वर्षा नाईक, अंजली वैराट, नूतन बहिरट, सोनाली इथापे व प्राध्यापक संजय मेमाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed