पिंपरी, दि.४:- पोटनिवडणुकीत उमेदवार कोण? या प्रश्नास अखेर विराम लागला असून भाजपकडून चिंचवड विधानसभेसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे तर कसबा विधानसभेत हेमंत रासने उमेदवार म्हणून घोषित केले आहेत .
तर महाविकास आघाडी कडून चिंचवड मतदारसंघात मागील निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध मोठे मताधिक्य मिळवलेल्या राहूल कलाटेंना उमेदवारी मिळणार तर कसबात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणूक प्रमुख ही घोषित करण्यात आले आहेत यानुसार चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे तर कसबा पोटनिवडणुकीसाठी माधुरी मिसाळ यांना निवडणूक प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे दोन्ही नावांची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच पंढरपूर व इतर ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला देत विरोधकांकडून निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात असल्याचे समोर आले आहे.
Comments are closed