राहुल कलाटे निवडणुक लढण्यावर ठाम ; अश्विनी जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार?
बिनविरोध निवडणूक नाहीच.
पिंपरी, दि.१०:- पुणे व पिंपरी-चिंचवड मधील कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत आता रंगत वाढली आहे. आज (दि.१०) उमेदवारास अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण अर्ज मागे घेणार व कोणते उमेदवार लढणार याची उत्सुकता मतदारांत होती. त्यानुसार आज दोनही मतदारसंघात पाच उमेदवारांकडून माघार घेण्यात आली आहे.
चिंचवड पोटनिवडणूकीत राहूल कलाटे यांनी अर्ज मागे न घेता लढण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांची डोकेदूखी वाढली आहे. मागील निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध राहुल कलाटे अपक्ष म्हणून लढले असतानादेखील चांगले मताधिक्य मिळवून पराजित झाले होते तसेच निवडणूक हरल्यानंतरही त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत राहिली.
मात्र यावेळेस राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याने मागील निवडणुकीत उमेदवार नसलेल्या राष्ट्रवादीचे मतदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे परतणार का? हा सवालही उपस्थित होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सातत्याने विजयी घौडदौड करणाऱ्या काटेंना विधानसभेच्या मतदारसंघाची गणिते जुळणार का ? हे ही महत्वाचे आहे.
तर चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने साहजिकच मतदान विभागले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे स्वतःचा मोठा मतदार वर्ग होता त्यांच्या कार्याने प्रभावित असणारा हा मतदार त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या मागे ठाम राहणार असे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपणच विजयी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीत मते विभागल्यास अश्विनी जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार असे चित्र निर्माण होत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार.
कसबा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार.
Sorry, there are no polls available at the moment.
Comments are closed