● बैस हे बीजेपीचे माजी खासदार, मंत्री.
● महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल
मुंबई,दि.१२:- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. सातत्याने वादग्रस्त विधान केल्याने संपुर्ण राज्यातील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी शेवटी स्वतःच पदावरून मुक्त होवून चिंतन मनन करण्यात पुढील आयुष्य घालवण्याचा विचार व्यक्त केला होता.
आता रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून काम करतील. ते सध्या झारखंडचे राज्यपाल असून मूळचे रायपूरचे आहेत.
जनतेच मत; चिंचवड मतदारसंघात मताधिक्य कुणाकडे राहील?
- भाजपा - अश्विनी जगताप. (40%, 5,907 Votes)
- राष्ट्रवादी - नाना काटे. (39%, 5,853 Votes)
- अपक्ष - राहुल कलाटे. (21%, 3,087 Votes)
Total Voters: 14,847
रमेश बैस हे झारखंडचे १० वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. भारतीय जनता पक्षाचे सदस्य, त्यांनी १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते
सुमित्रा महाजन, ओम माथूर यांच्या नावाची चर्चा होत असताना शेवटी वेगळीच निवड झाल्याने राजकीय गोटात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Comments are closed