जनतेच मत; चिंचवड मतदारसंघात मताधिक्य कुणाकडे राहील?
- भाजपा - अश्विनी जगताप. (40%, 5,907 Votes)
- राष्ट्रवादी - नाना काटे. (39%, 5,853 Votes)
- अपक्ष - राहुल कलाटे. (21%, 3,087 Votes)
Total Voters: 14,847
पिंपरी, दि.१२:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवीन थेरगाव रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वतीने भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन या संघटनेमार्फत मा. उच्च न्यायालय मुंबई येथे न्याय हक्कासाठी याचिका नाय प्रविष्ट आहे असे असताना महापालिकेने नेमलेल्या विनापरवानाधारक सुरक्षा रक्षक ठेकेदार मे. नॅशनल सिक्युरिटी सर्विसेस यांनी नवीन थेरगाव रुग्णालय येथे सहा कार्यरत याचिका कर्ते सुरक्षारक्षकांना तोंडी आदेशाने याचिका दाखल केल्याचा राग मनात धरून कामावरून काढून टाकले आहे.
यासंदर्भात संघटनेने महापालिका आयुक्त, मुख्य सुरक्षा अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, व पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या संदर्भात पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक यांनी नवीन थरगाव रुग्णालय येथे जाऊन तपासणी केली असता तेथील सहा सुरक्षारक्षक कामावरुन विनाकारण कमी केल्याचे आढळून आल्यामुळे महापालिका सुरक्षा अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी व एजन्सी मालक यांना काढलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावर परत घेण्याचे आदेश दिले आहे. त्यात म्हणल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आस्थापना पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदीत असून महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 व त्या अंतर्गत योजना 2002 व 2005 नुसार या मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक असताना देखील महापालिकेने खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ही बाब उक्त अधिनियम व योजनेचा भंग करणारी आहे. मा. उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायप्रविष्ठ असलेल्या याचिका मधील प्रतिज्ञापत्रात कोणत्याही सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करणार नाही अशी लेखी हमी दिलेली आहे तरी देखील महापालिकेने नेमलेल्या विनापरवाना सुरक्षा रक्षक ठेकेदाराने सहा सुरक्षारक्षकांना तोंडी आदेशाने कामावरून कमी केल्याचे म्हटले आहे व त्यांना त्वरित कामा वर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे परंतु अद्यापही त्या सुरक्षारक्षकांना कामावर घेत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे मुळातच दिनांक 20. 9. 2022 रोजी मा. उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना तसे आदेश दिले होते असे असताना मे नॅशनल सिक्युरिटी सर्विसेस यांनी नवीन थेरगाव रुग्णालय येथील कार्यरत याचिका कर्ते सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी करून मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याची माहिती प्रशांत खंडाळे, अध्यक्ष भारतीय सुरक्षारक्षक व जनरल कामगार युनियन यांनी दिली आहे.
Comments are closed