● सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे पुरस्काराने सर्प मित्रांचा गौरव.
नवी सांगवी,दि.१४:- सांगवी येथील निळूभाऊ फुले नाट्यगृह येथे वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य वतीने निसर्ग सरंक्षण, वन्यजीव व पक्षी तसेच खास करून सर्प अभ्यास व त्यांना वाचवण्यासाठी कार्य करणाऱ्या राज्यभरातील तसेच इतर राज्यातील सर्प मित्रांसाठी एक दिवसीय अभ्यास व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत साप व त्यांच्या विषयी सामान्य जनतेच्या मनात असलेली भीती दूर करणे व त्यांचा अभ्यास, सापांचे जैवविविधतेमध्ये असलेले महत्त्व या विषयावर जेष्ठ सर्पतज्ञ, अभ्यासक व कात्रज सर्पोद्यानाचे निलीमकुमार खैरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव,महाराष्ट्र राज्य सुनील लिमये, सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे, सर्प अभ्यासक राम भुतकर, विशेष वैद्यकीय अधिकारी फिजिशियन व आय.सी.यु. तज्ञ वाय.सी.एम. हॉस्पिटल पिंपरी, डॉ. विनायक पाटील, वन्यजीव निरीक्षक राजेश ठोंबरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. घनशाम पवार, राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सेवा निवृत्त शहर अभियंता प्रविण लडकत, सर्प अभ्यासक दिलीप कामत,अनिल राऊत, डिसीएफ पुणे विभाग, डॉ. अपुर्वा बांदल, राहुल पाटील, सहाय्यक उप वनसंरक्षक दिपक पवार, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, डॉ. सविता देवकाते व आदी उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश सारख्या इतर राज्यातूनही विशेष उपस्थित राहिलेल्या दोनशे व त्यापेक्षा जास्त सर्प मित्रांचा वन्यजीव पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने जेष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर व निलीमकुमार खैरे यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्षा सुरेखा बडदे व सचिव विनायक बडदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कामाची व त्याविषयी चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यशाळेस अध्यक्ष सुरेखा बडदे, सचिव विनायक बडदे, यांच्यासह प्रमोद कांबळे, अभिजीत वडपल्ली, प्रविण पवार, अनिकेत निर्मळ, सुरेखा बडदे,विनायक खोपडे , राहुल कांबळे, प्रशांत तायडे, गोपाल शिंदे, अनिकेत कांबळे, आकाश जाधव, गजानन मिटकरी, मिनाक्षी देसाई, अदिती निकम, वेदांत बहाळकर, सागर टेकाळे, साक्षी सुर्यवंशी, मधुरा शिंदे, पालवी बडदे, इम्रानखान पठान, गणेश माने, आकाश चांदने, मंथन गुरव, हेमंत शेळके, व्यंकटेश बडदे, पवन तावडे, कृष्णा तावडे, यश कवाष्टे, आदित्य पठारे, मयुरेश पवार आदीनी सहकार्य व परिश्रम घेतले. अनिल राऊत यांनी सूत्रसंचालन केले,आभार हभप शेखर महाराज जांभुळकर यांनी मानले.
महाराष्ट्रात प्रथमच राज्यभरातून जवळपास दोनशे सर्प मित्र व अभ्यासक यांना निलीमकुमार खैरे यांच्या सारख्या जेष्ठ सर्पतज्ञाच्या नावाने व त्यांच्या हस्ते सर्प रक्षक व अभ्यास क्षेत्रात वन्यजीव पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला, यामुळे पर्यावरण व सर्प रक्षणासाठी व अभ्यास करणाऱ्याना प्रोत्साहन व ऊर्जा मिळणार आहे.
– विनायक बडदे, सचिव, वन्यजीव पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था.
Comments are closed