पुणे दि.२३( punetoday9news): – वंदेभारत मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात ४ जुलै २०२० पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये २३ जुलै २०२० अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून  ४५७, दुस-या टप्प्यामध्ये ७८९ त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यामध्ये २ हजार २९७, चवथ्या टप्प्यामध्ये २०१४ अशा एकूण ५ हजार ५५७ व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील ४ हजार ५६८, सातारा जिल्हयातील २५७, सांगली जिल्हयातील २१८, सोलापूर जिल्हयातील २७१ तर कोल्हापूर जिल्हयातील २४३ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Comments are closed

error: Content is protected !!