पिंपरी, दि. १८:- कोकणी माणूस अतिशय सरळ आणि धाडसी आहे. हा माणूस सत्याच्या बाजूने नेहमी उभा राहतो. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला हे सत्य आहे. या विकासामुळेच आज अनेक कोकणी माणसांना पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगार उपलब्ध झाला हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील कोकणी माणसाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन विधीमंडळातील शिवसेनेचे पक्षप्रतोद व आमदार भरत गोगावले यांनी केले.
शिवसेना पक्षप्रतोद व आमदार भरत गोगावले यांनी काळेवाडी आणि रहाटणी भागात राहणाऱ्या कोकणी माणसांची भेट घेतली. सात ठिकाणी कोपरा सभा घेऊन त्यांनी कोकणी माणसासोबत संवाद साधला. अनेकांच्या घरी जाऊन चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, शिवसेनेचे नेते इरफान सय्यद, माजी नगरसेविका निता पाडाळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, प्रभाग स्वीकृत सदस्य देवीदास पाटील, भाजप युवा मोर्चा ओबीसी सेलचे कैलास सानप, अश्विनी कांबळे, कोकण महिला मंडळाच्या अध्यक्षा व शिवसेना महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख सुशीला पवार, शिवसेनेचे तात्या पालकर, प्रहारचे संजय गायखे, बाबासाहेब जगताप, प्रशांत दाकवे, प्रकाश लोहार यांच्यासह मराठवाडा मित्र मंडळ, खानदेश मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
आमदार भरत गोगावले म्हणाले, “भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पक्षनिष्ठ होते. तेवढीच जनतेप्रतीही ते निष्ठावान होते. त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. या मतदारसंघातील कोणत्याही रस्त्याने माणूस गेला तर त्याला सहज लक्षात येईल की मतदारसंघात काय विकास झाला आहे. अशा विकासपुरूषाने आपल्यातून लवकर निघून जाणे दुःखद आहे. आता त्यांच्या विकासाचा वारसा त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून जनतेला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी पोटनिवडणुकीत कोकणी माणसाने तसेच मराठवाडा आणि खानदेश भागातील नागरिकांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दयावे. कोकणी माणूस सरळ, साधा आणि धाडसी आहे. कोकणी माणूस कधीच असत्याची बाजू घेत नाही. तो नेहमी सत्याची लढाई लढतो. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघाचा विकासातून कायापालट केला हे सत्य आहे. या विकासामुळे अनेक कोकणी बांधवांना आणि भगिनींना पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील प्रत्येक कोकणी बांधवाने अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.”
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “कोकणी माणसामुळे शिवसेना मोठी झाली आहे. शिवसेना आणि कोकणी माणसाचे नाते एकदम घट्ट आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची पारंपारिक युती आहे. चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या युतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येक कोकणी बांधवाने भाजपला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.”
Comments are closed