पुणे,दि.१९ :- पुणे मनपाचे आनंद ऋषीजी महाराज माध्यमिक विद्यालय, वडगाव शेरी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महेश लाड अध्यक्ष स्वराज्य संग्राम, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्या शितल शिंदे, तसेच ज्ञानेश्वर शिंदे, संतोष झिपरे मराठा महासंघ, चौगुले, टाटा मोटर्स, कोष्टी पीएमपीएल आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती पोवाडे व नृत्य सादर केले. चिमुकल्यां पासून मोठ्यांपर्यंत चुनचुनित भाषण, ऐतिहासिक संदर्भ, आकाश दुमदुमणाऱ्या घोषणा यामुळे वातावरण शिवमय झाले होते. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश लाड म्हणाले की, “आयुष्यात पुढे जायचं असेल तर कॅलेंडर बघत असताना सामान्य माणूस फक्त तारीख म्हणून बघतो तर असामान्य माणूस त्या वेळेचा सदुपयोग करतो. विद्यार्थी मित्रहो शिवाजी महाराजांकडून काही शिकायचं असेल तर “शिवाजी” शिका वाचा जिंका.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नालदास मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed