पुणे,दि.२१:- जुन्नर येथे किल्ले शिवनेरी शिवरायांच्या जन्मभूमीवरती १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वराज्य संग्रामच्या वतीने किल्ले शिवनेरी येथे २० फेब्रुवारी रोजी स्वछता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमे अंतर्गत शिवयंतीच्या दुसऱ्या दिवशी किल्ला व परिसर स्वछता केली.
यात प्रामुख्याने प्लास्टिक बॉटल, गुटख्याच्या पुड्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, चॉकलेट्स, चुइगंमचे रॅपर्स मोठ्या प्रमाणात होते.
या वर्षी ११ पोती प्लास्टिक बॉटल्स, तुटलेलं चप्पल्स, गुटख्याच्या पुड्या, तंबाखूच्या पुड्या, भगवे फेटे-तुरे, टोप्या वगैरे कचरा मिळाला सदर कचरा वन विभागाचे अधिकारी रमेश खरमाळे, पुरातत्त्व विभागाचे विद्याधर सुर्यवंशी यांच्या निरीक्षणात जुन्नर नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला.
स्वछता मोहीम पूर्ण झाल्यावर बोलताना स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड म्हणाले कि, “गड किल्ले हे आपला ऐतिहासिक वारसा आहे अन तो जतन करताना आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी म्हणून किल्यावर येताना आल्याला सर्व वस्तु इकडे तिकडे न फेकता आपण जश्या आणल्या तश्याच त्या परत घेऊन जाव्यात.”
तसेच रमेश खंडागळे यांनी किल्ल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या मंडळीना संबोधित करत म्हणाले की ” शिवप्रेम हे फक्त दाखवून नाही तर कृतीतून घडवून आणले पाहिजे, गड किल्ले हे आपल्या स्वराज्याचे प्रेरणास्थान असून त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे. सर्व टीम स्वच्छता अभियान राबवित असताना इतर गावाहून आलेले शिवप्रेमी सुद्धा ते पाहून स्वच्छता करू लागले व त्यांनी जाताना वाटेत कुठे ही कचरा होणार नाही याची काळजी घेतली. या पुढे देखील किल्ले शिवनेरी हा प्लास्टिक मुक्त ठेवणायचा आमचा प्रयत्न कायमस्वरूपी राहील.
वर्षभर शिवकार्यात मग्न असणारे स्वराज्य संग्रामचे रमेश खंडागळे, संदीप कोकाटे, योगेश मोटे, युवराज मऱ्हळीकर, श्रीकृष्ण निकम यांच्या सह देशभक्त तरुण संघटनेचे प्रफुल्ल बाबर, तसेच भगिनी व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments are closed