पिंपळे गुरव,दि.२४:- पिंपळे गुरव येथे आदिवासी समन्वय समितीने आयोजित केलेला आदिवासी समाज स्नेह मेळावा उत्साहात पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोले विधानसभा आमदार डॉ. किरण लहामटे, जुन्नर विधानसभा आमदार अतुल बेनके डॉक्टर फोरम चे डॉ. दिलिप बांबळे होते.
प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे मा. शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, अकोले पंचायत समिती सभापती मारूती मेंगाळ, माजी नगरसेवक राजेन्द्र जगताप माजी नगरसेवक शिवाजी पाडूळे राष्ट्रवादी युवा नेते शाम जगताप डॉक्टर फोरम चे डॉ. दिलिप बांबळे उद्योजक वृक्षमित्र अरूण पवार महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदी उपस्थित होते
मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर विवीध आदिवासी सजमातीचे प्रतिनिधी आणि संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निमंत्रक आणि राष्ट्रवादी चे आदिवासी समाजाचे शहराध्यक्ष विष्णू शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकात आदिवासींचे भौगोलिक आणि लोकसंख्येचे वितरण आणि समाजाची ताकद याचे महत्त्व विषद करीत येणाऱ्या काळात आदिवासींचा एकसंघ संघटन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला
मार्गदर्शन करताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आदिवासी बांधवांशी असलेली त्यांची नाळ. जिव्हाळ्याचे नाते याबद्दल गौरव उदगार काढले आदिवासी बांधवांच्या विवीध प्रश्न. आणि समस्या सोडविताना देत असलेली समर्पणाची भावना व्यक्त केली शहरातील आदिवासीं चे सर्वसमावेशक संघटन निर्माणाचा विडा विष्णू शेळके यांनी उचलला असून त्यांची तडफ बघून नक्की यश येईल असे वाटते
मार्गदर्शक अकोले विधानसभेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासींचे प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीने मांडताना आपली काय भूमिका आहे समाजावर होणारे अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः ला समर्पित करण्याचें आश्वासन दिले पिंपरी चिंचवड शहरांतील आदिवासींचे प्रेम आणि संघटन पाहून मेळाव्याचे निमंत्रक विष्णू शेळके यांच्यासारख्या प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्व असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याचे आवाहन केले
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींच्या संदर्भात मंत्रालय स्तरावरून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि तरतुदी त्याच बरोबर नव्याने सुरू होणार असेलल्या योजनांची माहिती दिली.
आदिवासी युवक आणि महिला यांना प्रोत्साहन देत आर्थिक सक्षमीकरण साठी संघटितपणे काय काय करता येवू शकते याबद्दल विवेचन केले आयोजकांनी सर्व आदिवासी जमातींचे ऐक्य निर्माण करीत आयोजित केलेल्या मेळाव्याचे कौतुक केले
राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आदिवासी समजाच्या पाठीशी राष्ट्रवादी कशी खंबीरपणे उभी असुन समाजाचें हित अबाधित ठेवण्यास राष्ट्रवादीच समर्थ पर्याय असल्याचे प्रतिपादन केले आहे याबद्दल माहिती दिली
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार समितीचे सरचिटणीस देविदास आढळ, महिला अध्यक्ष सुशिला जोशी, सुनिता कोळप, रेखा काठे यांनी केले
कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे कार्याध्यक्ष राजेन्द्र रेंगडे, शितल मडके, पार्वती जोशी यांचा मोलाचा वाटा होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ साबळे यांनी केले तर आभार आदिवासी समन्वय समितीचे ज्येष्ठ नागरीक अध्यक्ष दिलिप लोखंडे यांनी केले
Comments are closed