पिंपरी (punetoday9news)दि .२३ :- जुनी सांगवी येथे टोळक्याने बुधवार दि . २२ च्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास येथील २२ गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.यात ढोरे नगर,जयमाला नगर,बुद्घघोष सोसायटी,पवनानगर,ममतानगर,प्रियदर्शनीनगर येथील कार,बस व इतर वाहनाच्या काचा कोयत्याने फोडल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त पोलीस स्टेशन कडे धाव घेतली होती .
कोरोना महामारीचे संकट यात असे गुन्हे सांगवी परिसरात वाढत असल्याने नागरीकांना मनस्ताप होत आहे.येथील नुकसान झालेल्या कार मालकांनी सकाळपासूनच गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सांगवी पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदवल्या होत्या .
मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि .२२ दारूच्या नशेत या टोळक्याकडून मध्यरात्री ही घटना घडली असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.याबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे म्हणाले,यात तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.अजून कुठे काही यांच्याकडून गुन्हा केला असल्यास त्याबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. यात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व अजय भोसले पोलिस निरिक्षक गुन्हे, दत्तात्रय गुळीग सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण, पोलीस नाईक चंद्रकांत भिसे ,कैलास केंगले, सुरेश भोजने, रोहिदास बोराडे, नितीन काळे, पोलीस शिपाई अरुण नरळे, शशिकांत देवकांत, विनायक देवकर, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर यांनी ही कामगिरी बजावली.
Comments are closed