● लग्नाच्या बोहल्यावर जाण्याअगोदर नवरदेवाने बजावला मतदानाचा अधिकार
सांगवी,दि.२६:- जुनी सांगवी बुद्धघोष सोसायटी येथील राजकुमार व माधुरी कांबळे यांच्या प्रेम कांबळे यांचे मतदान दिनाच्या दिवशी नऱ्हे येथे लग्न असतांना नवरदेव प्रेम याने येथे लग्नाच्या आधी जाण्याआधी सांगवी येथे मतदान करत आपले देशाच्या लोकशाही हक्काचा व राष्ट्र कर्तव्य आधी देत मतदान करून बोहल्यावर जाण्यास प्राधान्य दिले.
जुनी सांगवी येथील छायाचित्रकार राजकुमार कांबळे यांच्या मोठ्या मुलाचे रविवारी दि.२६ रोजी दुपारी एक वाजता पुण्यातील नर्हे येथील मधुरा या वधुशी लग्न होते. चिंचवड विधानसभा पोट निवडणूक अचानक लागल्याने लग्नाच्याच दिवशी मतदान असल्याने व सांगवी पिंपरी चिंचवड परिसरापासून सिंहगड रोड येथील नर्हे येथील ठिकाणी लांब अंतरावर लग्न असतानाही व लग्नाला उशीर होत असला तरी लग्नाचे वऱ्हाडी व लग्न समारंभास उपस्थित पाहुणे व नातलग यांना आधी मतदानाचा हक्क नंतर मी लग्नाला येतो असे सांगत जुनी सांगवी येथील नॅशनल स्कुल येथील मतदान केंद्रावर प्रेम कांबळे या नवरदेवाने कळवून राष्ट्र कर्तव्य व आपला मतदानाचा मूलभूत अधिकार प्रथम देत एक वेगळ्या स्वरूपाचे उदाहरण नागरिकाना मतदानासाठी पुढे येऊन आपला हक्क बजावण्यासाठी निर्माण केल्याचे दिसून आले, यावेळी प्रेम कांबळे, वडील राजकुमार कांबळे, आजी नलिनी शिंदे, भाऊ रणजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे उपस्थित होते. प्रेम याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
Comments are closed