हडपसर, दि.२८:-   विधी महाविद्यालय हडपसर सांस्कृतिक विभाग अंतर्गत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म दिवस २७ फेब्रु. हा “मराठी भाषा गौरव दिन” महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून विधी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड जयदेव गायकवाड (मा आमदार विधानपरिषद) आणि डॉ शंतनू जगदाळे(राष्ट्रपती पुरस्कार विजेते) लाभले होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी भूषवले

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सरस्वती प्रतिमा पूजन करून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मराठी अभिमान गीताने झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सनोबर काझी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

अध्यक्षीय भाषणा मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ रंजना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली.आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये ‘मराठी भाषा काल आज आणि उद्या’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास कानगुडे जोशना गायकवाड व आभार प्रदर्शन राजकुमार काटे यांनी केले.

 

 

 

 

 




 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!