पोटनिवडणूक live निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.?
Live पाहण्यासाठी ?
Live पाहण्यासाठी ?
https://www.youtube.com/live/04y0H01GTg0?feature=share
मतमोजणीच्या होतील ३७ फेऱ्या
मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती श्री. ढोले यांनी दिली आहे. त्यांनी इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह डॉ.देशमुख यांना माहिती दिली.
प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर १४ टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होतील. शेवटच्या फेरीनंतर यादृच्छिक (रँडमली) पद्धतीने व्हीव्हीपॅट काढून ५ व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची उद्घोषणा शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणार आहे. शिवाय भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या लिंकद्वारे देखील उमेदवाराला फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता येणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी शंकर आण्णा गावडे कामगार भवनाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे अशा व्यक्तींखेरिज इतरांना या भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Comments are closed