● व्याख्याते प्रा प्रदीप कदम यांच्यासह अन्य मान्यवरांनी केले मार्गदर्शन.
पिंपळे गुरव, दि.१:- पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. पिंपळे गुरव येथील चंद्रभागा बँक्वेट हॉलमध्ये मंगळवार दि. २८ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर दुधाळ, अमोल नागणे, लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले, निवेदक नामदेव तळपे, किलबिल हायस्कूलचे प्राचार्य संजय साबळे, देवराम पिंजण, कला निकेतन अकादमी चे संचालक प्रा. हरिश्चंद्र पाटील, कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा उमेश बोरसे, सुनील बेनके सर, प्रा सुधाकर खोपे, जनता शिक्षण संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी रामेश्वर होनखांबे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांच्या व्याख्यानाने उपस्थित शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध झाले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये चेतना गायकवाड, प्रियांका दौंडकर, समृद्धी काकडे, रोहिणी आरणे आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम प्रसंगी उद्योजक रविंद्र मासाळ, पत्रकार संतोष महामुनी, ज्ञानेश्वर टकले, संगीता पाचंगे, मिलिंद संधान, संदीप सोनार, सागर झगडे, पोपट आरणे, पवार सर आदी मान्यवरांसह क्लासेसचे संस्थापक महादेव मासाळ सर, संचालिका तेजस्विनी मासाळ यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
Comments are closed