खडकी, दि.२३ (punetoday9news) प्रतिनिधी- गणेश कांबळे :-

खडकी छावणी चे सी. ई. ओ. प्रमोद कुमार सिंह यांच्या नावाची बनवट सही व शिक्का मारून बनावट नियुक्ती पत्र करून तुकाराम ढोरे व गणेश आखाडे यांची ३ लाख रुपयांची फसवणूक. केली.

पोलीस सुत्रानुसार आरोपी अवधूत तुकाराम काशीद (रा. मु. पो. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर.) दयानंद दामोदर जाधव, (वय ३३ वर्ष, रा. मु. पो. कचरेवाडी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर.) भारत कृष्णा काटे. (वय ३९ वर्ष, रा. मु. पो. राजुरी, ता. सांगोला, जि. सोलापूर)  प्रमोद भगवान गुरव (वय.२४ रा.उलवे,नवी मुंबई, मुळ – उंद कराड)

यांनी तुकाराम ढोरे आणि गणेश आखाडे यांना खडकी छावणी येथे कामाला लावण्या करीता तीन लाख रु. घेऊन या दोघांची बनावट नियुक्ती पत्र तयार करून दिली. सदर बाब कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित खडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

वरील चारही आरोपीवर गु. र. नंबर २८१/२०२०, भा. दंड वि. कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून किती लोकांना फसवले आहे याचा तपास पो. नि.अंजुम बागवान, पो. उप नि. विजय झंजाड, सहायक पो. फोजदर शंकर पाटील, सुनिल पवार, सुरेंद्र साबळे, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, शितल शिंदे, सुहास कदम करीत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!