पिंपरी, दि.४ :-  चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे २६ उमेदवारांची जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार जर एखादा उमेदवार त्या मतदार संघातील एकूण उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांपैकी १/६ इतकी मते मिळवू शकला नाही (NOTA वगळून) तर उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.

यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये इतकी आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत २ लाख ८४ हजार ३९७ वैध मते आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (१/६) पेक्षा अधिक म्हणजेच ४७ हजार ४०० इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने २ उमेदवार वगळता इतर सर्व २६ उमेदवारांची एकुण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.

अनामत रक्कम जप्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये राहुल कलाटे, सुभाष बोधे, गोपाळ तंतरपाळे, सिद्दिक शेख, प्रफुल्ला मोतलिंग, बालाजी जगताप, किशोर काशीकर, श्रीधर साळवे, दादाराव कांबळे, डाॅ.मिलिंदराजे भोसले, अमोल(देविका) सुर्यवंशी, रफिक कुरेशी, मनोज खंडागळे, तुषार लोंढे, राजू काळे, हरिष मोरे, ॲड.सतिश कांबीये, जावेद शेख, सुधीर जगताप, अजय लोंढे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, सोयलशहा शेख, सतिष सोनावणे, चंद्रकांत मोटे आणि अनिल सोनवणे यांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!