पिंपळे गुरव ,१० :- दि. ८ रोजी सकाळी ७ ते ११ वाजता पिंपळे गुरव,राजमाता जिजाऊ गार्डन समोर एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल,मोहम्मदवाडी,हडपसर व सनराइस् मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी सनराइस् मेडिकल फाउंडेशनचे प्रवक्ते संजय मराठे म्हणाले कि ” आजकालच्या जीवनात मोबाईल व टीव्हीचा जास्त वापरामुळे नागरिकांचे डोळे खूप खराब होत आहे या डोळ्यांची तपासणी व डोळ्यांची निघा कशी राखायची याची माहिती देणे खुप आवश्यक आहे याच गोष्टीचा आम्ही विचार करून हे नेत्र तपासनी शिबिर आयोजित केली आहे.”
या महिला दिन निमित्त झालेल्या शिबिरामध्ये एकूण ११० लोकांनी तपासणी केली त्यातील ९ लोकांना मोतीबिंदू आढळला . ज्या नागरिकांना मोतीबिंदू आढळला त्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. मोतीबिंदू ऑपरेशन योजने अंतर्गत मोफत किंवा अत्यल्प दरात हे ऑपरेशन करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन प्रभाग क्रमांक ३१ च्या महिला अध्यक्ष कोमल गौंडाडकर यांनी केले तर प्राध्यापक उमेश बोरसे,सनराइस् मेडिकल फाउंडेशनचे प्रवक्ते संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, एडवोकेट प्रवीण चौगुले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रियंका नितीन सोनवणे (ऑटोमेट्रीस्ट) सुप्रिया भोसले (असिस्टंट) व विशाखा सांगळे (ऑटोमेट्रीस्ट) यांनी या शिबिरात मोलाची कामगिरी केली.
Comments are closed