नवी सांगवी,दि. १० :-  पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी परिसरातील  आदर्श नगर येथे जगदंब युवा प्रतिष्ठान, ओम साई ग्रुप यांच्या वतीने अखिल नवी सांगवी शिवजयंती उत्त्सवाचे आयोजन करण्यात आले .

जगदंब युवा प्रतिष्ठानची शिवजयंती आपल्या दिमाखदार सजावट आणि समाजप्रबोधनासाठी नावाजली जाते, या वर्षी देखील सालाबाद प्रमाणे आकर्षक सजावटीच्या जोडीने शिवरायांच्या सर्वधर्म सहिष्णू वृत्तीचा जागर करण्यात आला. संध्याकाळी स्थानिक ढोल ताशांच्या पथकांकडून स्थिर वादन तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.  सभामंडपास आकर्षक विद्युत  रोषणाई करण्यात आली . तसेच या सजावटीतून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला . परिसरातील  वातावरण शिवमय झाले होते यावेळी परिसरातील नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!