भोसरी , १३ :- स्पर्धात्मक युगामध्ये माणसाचे जगणे अधिक अस्थिर आणि धावपळीचे होऊन गेले आहे. अशा स्थितीत उत्तम आरोग्यासाठी “प्रिव्हेन्शन” हा एकच कानमंत्र असू शकतो असे मत अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिपाली चिंचोळे यांनी सोमवारी व्यक्त केले. 


अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर  व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . यावेळी डॉ. दिपाली चिंचोळे बोलत होत्या . यावेळी क्रांती चव्हाण, डॉ. अभिजित घंगाळे , न्यूरोसर्जन डॉ. विवेक बोन्डे,  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, तसेच पराग कुंकूलोळ उपस्थित होते.

13 ते 15 मार्च या कालावधीत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबीरा दरम्यान एक्स रे, सोनोग्राफीसह, टूडी इको यांसह इसीजी, सीबीसी, आरएनटी,  फिजिशियन ओपिनियन देण्यात येणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. दिपाली चिंचोले, म्हणाल्या बऱ्याचदा अनेक जण आपल्या आरोग्याच्या बाबत दुर्लक्ष करताना दिसतात. सुपर स्पेशलिटी कन्सल्ट अर्थात सल्ला घेणे टाळतात. यामध्ये आर्थिक भाग महत्त्वाचा असतो. मात्र तरी देखील कोणत्याही आजाराची गुंतागुंत वाढल्यानंतर येणारा आर्थिक भार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो. हे टाळण्यासाठी रोग निदान किंवा प्रिव्हेन्शन ही काळाची गरज बनत चाललेली आहे. एखाद्या रोगाचे निदान किती महत्त्वाचे होते हे जवळचा व्यक्ती गमावल्याशिवाय कळत नाही मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हा उशीर टाळण्यासाठीच वर्षातून एकदा सर्व प्रकारच्या तपासण्या करणे गरजेचे आहे.  कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या आजारांमध्ये खूप उशिरा आजार कळल्यानंतर त्यातील गुंतागुंत वाढत जाते.  मात्र आपली मानसिकता ही कोणताही आजार अंगावर काढण्याची असल्याने अनेकदा रुग्ण यामध्ये आजार बळावून बसतात.
हाच विचार करून अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटलने यंदाच्या वर्षात दहा हजार हेल्थ कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर हे कार्ड नागरिकांना दिले जाणार आहे. ज्या माध्यमातून एका कार्डवर कुटुंबातील सहा सदस्यांना उपचार घेता येणार आहे. असेही डॉ. दिपाली चिंचोळे यांनी सांगितले.
शिबिरासाठी पहिल्या दिवशी शहरातील पन्नास हून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली.
शिबिराबाबत मनोगत पराग कुंकूलोळ यांनी व्यक्त केले. तर आभार नितीन शिंदे यांनी मांडले. या शिबिरासाठी जमीर सय्यद, प्रमोद सस्ते, नवनाथ कापले, महादेव मासाळ, बेलाजी पात्रे, योगेश घाडगे, विजय जगदाळे, संदीप सोनार, आदींनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!