नवी सांगवी,दि.१७ : ओम साई फाउंडेशन, सनराइस् मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमातून पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यांना माहिती पत्रक व मास्कचे वाटप करण्यात आले. जगभर डोकं वर करू पाहत असणाऱ्या H3N2 या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नुकताच पिंपरी चिंचवडचा पहिला रुग्ण दगावला आहे. म्हणून या विषाणूमुळे पुन्हा कुठली ही जीवित हानी होऊ नये यासाठी पिंपळे गुरव मधील प्रार्थमिक शाळेमध्ये H3N2 या विषाणू विषयी जनजागृती व्हावी यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती पत्रक व मास्क देऊन या विषयी कशी काळजी घ्यावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की मागे कोरोना काळामध्ये कोरोना या विषाणूमुळे आपली खूप मोठी आर्थिक व जीवित हानी झाली आहे याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यावी लागेल.
यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,रवी खोकर,प्रफुल उतखडे,मुख्याध्यापक साधना वाघमारे,शिक्षक संतोष वाघमारे,करुणा परबत,भारती वरने,शेजवळ सुनीता,नैना रत्नपारखी,जयश्री लांघी,अलका आगवे,संगीता आव्हाड,नामदेव चौगुले,पंकज चौधरी,सुभाष गवारी,मंगल शेळकंदे,मनीषा घोरपडे,मुक्ता असवले,मनीषा दरेकर,योगिता परबत आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments are closed