मावळ,दि.२ :- पुण्यातील मावळ मधील शिरगाव(प्रतिशिर्डी) विद्यमान सरपंचाची शनिवार (दि.१) भर रस्त्यात कोयत्याने वार करून हत्या झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
पुण्यातील विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे ( वय ४७) यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे . जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंच म्हणून त्यांची निवड झाली होती. शनिवारी रात्री शिरगाव येथील साई मंदिरासमोर ते मित्रांसह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करीत हल्ला चढवला व हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
Comments are closed