पुणे, दि.४ :- केंद्र सरकारच्या प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, कौशल्य विकास, उद्योजगता विभाग व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ६ एप्रिल रोजी शिकाऊ उमेदवारी योजनाअंतर्गत मोफत जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवारी योजना, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशनल स्कीम व अप्रेंटिसशिप पोर्टलबाबत माहिती देण्यात येणार असून आस्थापनांच्या शंकाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आस्थापनातील नवीन तंत्रज्ञानाशी परिचय होऊन कुशल प्रशिक्षणार्थी घडवण्याचे महत्वाचे कार्य या जागरुकता कार्यशाळेमुळे शक्य होणार असून आस्थापनांना कुशल कर्मचारी मिळण्यासाठीदेखील या योजनेचा फायदा होईल.
या कार्यक्रमामध्ये प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाचे सहायक संचालक रोहन पाटील व प्रशिक्षण अधिकारी विजयकुमार हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत सहभागासाठी https://forms.gle/rMSaVga5N8pe7RtS9 हा गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनाप्रमुखांनी कार्यशाळेच्या दिवशी पीसीईटी सभागृह, ५ वा मजला, आर्किटेक्चर बिल्डिंग, सेंट्रल प्लेसमेंट सेलजवळ, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सेक्टर २८. निगडी प्राधिकरण, पुणे – ४११०४४ येथे सकाळी १० वाजता हजर रहावे. आस्थापनांसाठीचे सत्र सकाळी १० ते दुपारी २.३० पर्यंत असेल. प्रत्येक आस्थापनेमधून जास्तीत जास्त २ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात, असेही कळविण्यात आले आहे.
Comments are closed