पुणे दि.६:- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी ११ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
ग्राहक संघटना प्रवर्ग १० आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, वैद्यकीय व्यावसायिक, शेतकरी अशा प्रवर्गातून प्रत्येकी २ तर महानगरपालिका सदस्य, नगरपरिषद सदस्य, व्यापार, उद्योग, शाळा, महाविद्यालय, पेट्रोल विक्रेता, गॅस विक्रेता यातून प्रत्येकी १ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी कागदपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती तथा जिल्हाधिकारी, पुणे यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) पुणे – ४११००१ येथे पाठवावेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
Comments are closed