हडपसर, दि.८ :- हडपसर मधील महाविद्यालयात स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे विक्रांत देशमुख पोलीस उपायुक्त पुणे, बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, ॲड. केतन कोठावळे अध्यक्ष पुणे बार असोसिएशन तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. संदीप कदम मानद सचिव पु.जि. शि.मं.आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांनी केले. त्यामध्ये महाविद्यालयाचा निकाल, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, चर्चासत्र, अभिरूप न्यायालय, संसद, क्रीडा विभाग इत्यादीचा अहवाल सादर केला आणि सर्व पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले.
तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पोलीस उपअधीक्षक माननीय श्री विक्रांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मा.ॲड.केतन कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॲड.संदीप कदम यांनी विधीक्षेत्रातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बी एल एल बी ची विद्यार्थिनी प्रतीक्षा ठुबे हिला सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट स्टाफ म्हणून प्रा.सनोबर काझी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
केतन पवार एल एल बी तृतीय वर्ष यांना महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभ नंतर आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांनी लावणी, पोवाडा, शास्त्रीय, संगीत,नृत्य, समूह नृत्य, यावर कला प्रकारांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुक्त केले.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन आणि आयोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थी ,विद्यार्थी प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिवले, राजकुमार काटे आणि प्रांजल ढमाले यांनी केले तसेच आभार सुहास कानगुडे आणि केतन पवार यांनी मानले.
Comments are closed