पुणे दि.११:- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पालकमंत्री पाटील यांनी महात्मा फुले यांच्या निवास्थानी असलेल्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.
पालकमंत्री पाटील यांनी भिडेवाडा येथेही भेट देऊन महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन केले.
Comments are closed