नवी सांगवी,दि.११:- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नवी सांगवी, साई चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट येथे मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती महोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे. सर्वांना मोफत शिक्षण सर्व प्रथम राबवणारे भारतीय शिक्षणाचे प्रणेते म्हणूनही आपण महात्मा जोतिबा फुले यांना ओळखतो.
यावेळी सिने अभिनेते साहिल कांबळे, कुणाल धिवार, रमेश डफळ, सुनिल सावंत, नितीन धोधाड, रमेश चौधरी, श्रीराम परतले, सचिन कांबळे, योगेश पैठणे, सौरभ इसवे, निलेश बडगुजर, विष्णू खेडेकर, बळीराम बिरादार, महादेव फुलगमे, विपुल शिंदे, अंकुश आपेट, नायडू आण्णा, भरत प्रसाद, अरुण जाधव, गणेश मते, नरसिंग यादव, गणेश पैठणे, सयाजी आगलावे आदी भाजी विक्रेते व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed