पिंपरी,दि.१२ : – रहाटणीगाव येथील श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त विविध पांरपारिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (दि. 13) आणि शुक्रवारी (दि. 14) ढोल लेझीम स्पर्धा, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या सहा सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती समस्त ग्रामस्थ मंडळ रहाटणीगाव यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

गुरूवारी (दि. 13) रोजी पहाटे 5 ते 6 वाजता श्रींची महापुजा व अभिषेक होणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजता भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम तर सायंकाळी 5 ते 7 दरम्यान श्रींच्या काठीची मिरवणूक होणार आहे. रात्री 9 वाजल्यानंतर छबीना पालखी मिरवणूक आणि ढोल ताशा लेझीम स्पर्धांचे आयोजन केले आहे.

ढोल लेझीम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास 51 हजार रुपयांचे बक्षिस,

द्वीतीय येणाऱ्या संघास 41 हजार 01 रुपये,

तिसरा क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघास 31 हजार 01,

चौथा क्रमांक प्राप्त करणाऱ्यांना 25 हजार 01,

पाचवा आणि सहावा क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघास अनुक्रमे 20 हजार 01 आणि 15 हजार 01 रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना प्रत्येकी 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या बरोबरच पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या संयुक्‍त मान्यतेने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा देखील होणार अहोत. रविवारी (दि. 14) दुपारी तीन वाजल्यानंतर होणार आहेत.

पुरूष गटातील विजेत्याला श्री काळभैरवनाथ किताब तर महिला गटातील विजेत्याला श्री जोगेश्‍वरी किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे.

खुल्या गटात प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला 71 हजार रुपये,

द्वीतीय येणाऱ्या स्पर्धकाला 41 हजार रुपये,

खुल्या गटात तृतीय येणाऱ्या स्पर्धकाला 25 हजार रुपये रोख रक्‍कम दिली जाणार आहे.

55 किलो वजनी गटात श्री जोगेश्‍वरी किताबासाठी रंगलेल्या कुस्तीत विजेत्या प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 20 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 15 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 10 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

या बरोबरच 74 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 21 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 15 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 10 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

65 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 15 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 10 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

57 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 15 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 10 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 10 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 7 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.

42 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 10 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 7 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

38 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला 10 हजार रुपये,

द्वीतीय क्रमांकाला 7 हजार रुपये,

तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने भव्य ट्रॉफी, रोख बक्षिस तसेच प्रत्येक पराभूत पैलवानाला फेरीनुसार रोख रक्‍कम बक्षिंस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 


 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!