पुणे,दि.१३:-  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत उन्हाळी क्रीडा शिबिर, छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा शिबिराचे उद्घाटन पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड येथील क्रीडा शिक्षक निलेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. ११ ते २८ या दरम्यान हे शिबिर होणार आहे. यात विविध लंगडी, खोखो , डॉजबॉल यासोबत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच छंद वर्गात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलांना वाव देण्यासाठी चित्रकला, हस्ताक्षर यांचा देखील समावेश केला आहे.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक अर्पिता जगताप, सुरुची जगताप, चित्रकला मार्गदर्शक माधुरी जगताप, हस्ताक्षर मार्गदर्शक दीपक कांदळकर सर्व शिक्षक उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय मंजुषा चोरामले यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा यादव यांनी केले. आभार नरेंद्र महाजन यांनी मानले.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!