पुणे,दि.१३:- मंगळवार दि. १८ रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार आहे. या दिवशी हिंगणे, सनसिटी रोड, माणिकबाग, वडगाव, धायरी या परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व बुधवार दि. १९ रोजी सदर भागामध्ये सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- हिंगणे, विश्रांतीनगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर इ. परिसर.
Comments are closed